Gopinath Munde Information in Marathi

Nandkishor Wagh

Gopinath Munde Saheb


अठरा पगड जातींचा जननायक
लोकनेता
स्व.ना.गोपीनाथजी मुंडे साहेब

संपूर्ण नाव: गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे
जन्म: १२ डिसेंबर १९४९
जन्मगाव: नाथरा,ता.परळी वैजनाथ,जि.बीड
शिक्षण:बी.कॉम.,बी.जी.एल
प्राथमिक शिक्षण:नाथरा, ता.परळी वैजनाथ
माध्यमिक शिक्षण:जिल्हा परिषद, परळी
महाविध्यालीन शिक्षण: अंबाजोगाई, जी.बीड व पुणे
कायद्याचा अभ्यास:१९७६ मध्ये आर.एल.एल

राजकीय कारकीर्द:
  • प्रमोद महाजन यांच्या मैत्री व प्रेरणेतून राजकारणात प्रवेश
  • १९७१ साली भारतीय जनसंघासाठी लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदार मतदार संघात प्रचारात सक्रीय सहभाग
  • १९७१ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातसंघ शिक्षा वर्गात सहभाग
  • संभाजी नगर मंडळ कार्यालय ही जबाबदारी त्या अंतर्गत सहा शाखांची जबाबदारी शिवाय विध्यार्थी आघाडीच्या पुणे शाखेचे प्रभारी
  • विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून आणीबाणी विरोधात आंदोलनात सहभाग
  • १९७०-७३ मराठवाडा विकास आंदोलनात सहभाग.
  • १९७५ आणीबाणी लागू होताच भूमिगत.नंतर पोलिसांनी अटक करून नाशिक कारागृहात १६ महिने कारावास
  • १९७८ बीड जिल्हापरिषद निवडणुकीत उजनी ता.अंबेजोगाई मतदार संघातून विजयी.
  • औरंगाबाद येथील मराठवाडा विध्यापिठाच्या नामांतर आंदोलनात सहभाग.
  • १९८० रेणापूर ता.बीड विधानसभा मतदार संघातून प्रथम विजयी
  • १९८०-८२ भारतीय जनता पक्ष युवामोरच्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड.
  • १९८५ भाजपाच्या प्रदेक्षाध्यक्ष पदी निवड.
  • १० मार्च १९८८ रोजी मुंबईत दोन लाख शेतकऱ्यांचा मंत्रालयावरील मोर्च्याचे नेतृत्व
  • १९८९ मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची यशस्वी चळवळ.शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
  • १६ डिसेंबर १९८९ नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा,सात लाखांवर शेतकरी सहभागी.
  • १९९० साली रेणापूर मतदार संघातून विधानसभेवर दुसऱ्यांदा विजयी.
  • १९९१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नागपुरात निवड.
  • १९९४ मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ ऐतिहासिक संघर्ष यात्रा.
  • १९९५ मध्ये रेणापूर मतदार संघातून विधानसभेवर तिसऱ्यांदा विजयी.
  • १९९५ ते १९९९ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड.गृह,अर्थ,पाटबंधारे,उर्जा आदी खात्यांचा कार्यभार सांभाळला या काळात “मोक्का” कायदा.गुंतवणूकदारांना संरक्षण देणारा कायदा,भटक्या मुक्त जमातीसाठी मंत्रालय,मागसजाती व आर्थिक दुर्बलांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ आदी महत्वाचे निर्णय घेतले.
  • २००० साली रेणापूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी.
  • २००१ साली भाजपाच्या राष्ट्रीय उपाधाक्षपदी निवड.अक्कलकोट ते कल्याण सलक ९० दिवसांची संघर्षयात्रा.
  • २००३ भाजपाच्या प्रदेक्षाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड.
  • २००४ रेणापूर मतदार संघातून सलक पाचव्यांदा निवड
  • २००६ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबईच्या अध्यक्षपदी निवड.
  • २००७ भाजपाच्या केंद्रिय कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून निवड.
  • २००९ बीड लोकसभा मतदारसंघातून देशातील क्रमांक एकची मते घेऊन विजयी.
  • २०१० केंद्र सरकारच्या रसायने आणि उर्वरके समितीचे अध्यक्ष
  • २०१४ बीड लोकसभा मतदार संघातून एक लाख ३६ हजार मतांनी विजयी.
  • २६ मे २०१४ केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ.