Gopinath Munde Family Photos

Gopinath Munde Saheb Family Photos

                   Gopinath Munde with wife Pradnya Munde and daughter Pankaja,yashashri and Pritam
                                   Gopinath Munde with wife and Daughter PANKAJA MUNDE
Emotional Sound for Gopinath Munde from Public

Gopinath Munde

नाथरा ते दिल्ली
कार्यकर्ता ते लोकनेता
गोपीनाथ मुंडे साहेबांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई आणि इतर कुटुंबीय पंढरपूरच्या वारीत
सहभागी होत.त्यांच्या प्रेरणेतून साहेब लहानपणापासूनच वारीमध्ये सहभागी होत असत.घरापासून रोज १२ कि.मी.जाऊन त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.मराठवाड्यात त्यावेळी श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत श्रीसंत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या भक्तांची संख्या मोठी होती.मुंडे साहेब आई वडिलांबरोबर भगवान बाबांचे कीर्तन ऐकण्यासाठी जात असे.व त्यातून त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार झाले.१९६९ मध्ये वडिलांच्या अकाली निधनानंतर आई व थोरले बंधू पंडित अण्णा मुंडे,भगिनी सरस्वती कराड,धाकटे बंधू माणिकराव,व्यंकटराव यांचे प्रेम व आधार मिळाला.परळीच्या आर्य समाज मंदिरात त्याना वाचनाचा छंद जडला.आणि समाजकारण,धर्म,मानवतावाद याविषयी आकलन होऊ लागले.अंबाजोगाईत त्यांच्यातील कार्यकर्ता जागा झाला.त्यावेळी त्यांना अ.भा.वि.परिषदेच्या शहर मंत्रीपदाची जबाबदारी दिली.ते योगेश्वरी ह्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रमोदजींच्या सहवासात आले.शिक्षणाबरोबरच समाजकारण सुरु होते. त्यांचा उत्साह व तळमळ बघून त्यांना रा.स्व.संघाने पुण्यात विशेष वर्गात पाठविले.तिथे शिस्त,समर्पण,मानवतावादाचा संस्कार द्रुढ झाला.समर्थ शाखेचे मुख्य शिक्षक आणि चाणक्य शाखेचा कार्यवाह म्हणून संघाने त्यांची नेमणूक केली.या काळात त्यांना सरसंघचालक गोळवलकर गुरुजी,अटलबिहारी वाजपेयी यांना ऐकण्याची संधी मिळाली.
१९७४मध्ये अ.भा.वि.परिषदेचा अंबाजोगाईत मोठा मेळावा झाला.त्यावेळी गोपीनाथरावजी मुंडे साहेब कार्यकर्ता ते विद्यार्थीनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यांचा विवाह २१ मे १९७८ रोजी त्यांचे मित्र व सहकारी प्रमोदजी महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा यांच्याशी अंबेजोगाई येथे झाला.मुंडे साहेबांना पंकजा पालवे-मुंडे (मंत्री महाराष्ट्रराज्य),खा.प्रितम खाडे-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत. 

हजरजबाबी,दिलदार आणि उमदे नेतृत्व

मुंडे साहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व होते धाडसी आणि आक्रमक स्वभावाचे नेते होते.वकृत्व शैली ग्रामीण होती.श्रोत्यांना हबरजबाबी स्वभावाने आणि आपल्या खास शैलीतील वकृत्वाने ते हसवत आणि श्रोत्यांमध्ये लोभही निर्माण करीत असत.ते पक्षामध्ये खूप लोकप्रिय होते.शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचाशी त्यांचे खूप जवळचे संबंध होते.मंत्री मा.छगन भुजबळसाहेबांशी त्यांची घनिष्ट मैत्री होती.बीड,नगर आणि राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे केंद्र बनलेल्या वंजारी समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.वंजारी समाजाला ओ.बी.सी. या प्रवर्गातून एन.टी. या प्रवर्गात टाकण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.श्रीक्षेत्र भगवानगडाला ते गुरु मनात.त्यांची या गडावर एवढी श्रद्धा होती कि गडाच्या गादीवर कोणीही असो त्यावर त्यांची अपार श्रद्धा असे.एवढा मोठा नेता या गादीवर नतमस्तक होत असे.भगवान गडाच्या विकासासाठी साहेबांनी भरीव योगदान दिले.ते भगवानगडाचे आधारस्तंभ होते.त्यांच्यामुळेच भगवानगड महाराष्ट्रासह सर्व देशात माहित असे.दसऱ्याला न चुकता ते भगवान गडावर येत असत.त्यांच्यामुळे गडावर चैतन्य येत असे.
देशभरात सुरु असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या चळवळीतही मुंडेसाहेब सक्रीय होते.तेव्हा ते पुण्यात विद्यार्थी समितीचे कार्यवाह होते.ते लॉच्या शेवटच्या वर्गात शिकत असताना देशात आणीबाणी लागू झाली.जनसंघाचे नेते वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी गोपीनाथरावांना राजकारणात येण्याची गळ घातली.आणीबाणीत दोन महिने भूमिगत राहून औरंगाबाद मध्ये सत्याग्रह केला.त्यांना तीन महिने हरसुल कारागृहात ठेवण्यात आले.तेथून बाहेर पडताच मिसा या कायद्यांतर्गत अटक करून १ ऑक्टोबर १९७५ नाशिकच्या कारागृहात पाठविण्यात आले.तेथील १६ महिन्याच्या कारावासात त्यांच्यावर मोहनधारीया,बापूसाहेब काळदाते,बाबा भिडे,प्रमोद महाजन यांच्या विचारांचा प्रभाव पडला.त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कामाला वाहून घेतले.पक्षाच्या राज्यासहसचीवपदाची जबाबदारी मिळाली.१९७८ मध्ये उजनी मतदार संघातून बीड जिल्हा परिषदेवर निवडून आले.१९८० मध्ये भाजपा युवा मोर्चाचे प्रदेक्षाध्यक्ष तर १९८२ मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यभार पाहिला.
वैजनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती,अल्पावधीतच सहकार क्षेत्रात ठसा उमटवला.मुंडे pattern म्हणून सहकारातील कारभाराच्या यशाची चर्चा वैजनाथ कारखान्याच्या प्रगतीच्या रूपाने एकत्र चर्चेत राहिली.सामाजिक आणि राजकीय कारकीर्तीच्या १९७४ ते १९९४ या दोन दशकामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे नेतृत्व,आक्रमकशैली,प्रभावी नेतृत्वगुणांमुळे भाजपाला राज्यभरात उंचीवर नेऊन ठेवले.वयाच्या ३०व्या वर्षी रेणापूर मतदारसंघ विधानसभेची निवडणूक जिंकणारे साहेब स्वस्थ कधीच बसले नाहीत.युती सरकारची साडेचार वर्षाची कारकीर्त वगळता कायम विरोधी पक्षात राहिलेल्या साहेबांचे संपूर्ण जीवन संघर्षमयच राहिले आहे.महापुरानंतर अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी काढलेली गोदावरी परिक्रमा यात्रा असो कि विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी २००९ मध्ये उभे केलेले शेतकरी संघर्ष अभिमान असो,मराठवाडा विकास आंदोलन,मेद्दीकॅल कॉलेज चे आंदोलन,उसतोड कामगारांचे आंदोलन,एप्रिल २०१३ मराठवाड्यातील दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसांच्या उपोषनानेच सरकारला मदत जाहीर करावी लागली.नेहेमी हसतमुख आणि जनसमुदायाला सोबत घेऊन काम करण्याचा साहेबांचा हातखंडा कधीच विसरता येनात नाही.संघर्ष करणे हा त्यांचा स्वायीभाव होता.वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले.विधिमंडळातील भाषणामधून तर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा आदर्श घालून दिला.त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष,शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी,भटक्या विमुक्तजाती जमांतीपर्यंत पोहोचले.
आपला मतदार संघ नव्हे तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैक्तिक स्नेहबंध जोपासणाऱ्या साहेबांनी पक्षाबाहेर आणि पक्षात कधी भेदभाव केला नाही.म्हणूनच माणसं जोडणारा नेताम्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.मंत्र्यांपुढे गाऱ्हाणे मांडण्यात कमीपणा मानला नाही कि विधिमंडळात किल्ला लढवताना भीड बाळगली नाही.अचूक वेळी योग्य प्रश्न उचलून ते सोडवण्यासाठी संघर्ष करण्याची त्यांची हातोटी सत्ताधार्यांना कायम कोंडी करत असत.निवडणूक काळात १८-१८ सभा घेऊन गावानगाव पिंजून काढणारे साहेब एरवीही शांत बसत नसत.लोक आणि कार्याकार्त्यांबाद्दलचा जिव्हाळा,तळमळ आणि आपुलकी राजकीय नेत्यांमध्ये अभावानेच आढळते.सत्तेचा तारा त्यांच्या वागण्याबोलण्यातून जाणवतो पण गोपीनाथरावजी मुंडे साहेब याला अपवाद होते.बीड,परळी,नाशिक काय पण मराठवाड्यातील माणूस मुंबईत,दिल्लीत भेटला तरी ते त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत.आलेल्या माणसाला प्रवास आणि जेवणाबद्दल विचारपूस करूनच ते मूळ विषयाला हात घालत.पक्षबांधणी करण्यात साहेबांचा महत्वाचा वाट होता.ते जनतेचे होते,अठरापगडजातीतील लोकांना सर्व जातीधर्माना पक्ष प्रवेश देण्याचे महान काम साहेबांनी केले.१९८५ मध्ये प्रदेशाध्यक्ष असताना नागपूर येथे काढलेली किसान रैली देशाच्या इतिहासात सर्वात मोठी राल्ली होती.देशवासीयांनी शेतकऱ्याच्या रुपात बदललेला भाजपा पाहिला. ६५ दिवसांची संघर्ष यात्रा काढली, २० किमी यात्रा फिरली. शेतकरी आणि ओबिसी नेता म्हणून भारतभर प्रसिद्ध झाले. तरीही मुंडेसाहेब फक्त ओबीसीचे नेते नव्हते तर सर्व समाजात त्यांचे स्थान होते. मुख्य म्हणजे राज्यातील विविध पुरोगामी पक्षामधील कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याची त्यांची हातोटी वाखानण्यासारखी होती. मुंडेसाहेब मराठवाड्यातील असले तरी पश्चिम विधर्भ, कोकण, उत्तरमहाराष्ट्र येथील राजकीय संस्कृतीची त्यांना पूर्ण जाण होती. त्यामुळेच प्रत्येक विभागात त्यांचे स्वताचे समर्थक होते. युतीतील रुसवे-फुगवे काढण्याचे कसब हे केवळ साहेबांकडेच होते.शिवनेरी ते शिवतीर्थ हि संघर्षयात्रा काढून राज्यात युतीसाठी वातावरण तयार केले आणि भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. महाराष्ट्रात युतीची सत्ता आली त्याचे श्रेय गोपिनाथरावजी मुंडे साहेबांनाच  जाते त्यांच्या प्रचंड लोक्साम्पार्कामुळे कुठलाही माणूस त्यांच्यापर्यंत जाऊ शकत होता. महाराष्ट्राच्या राजकारणात जनाधार असलेला नेता म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची सर्व खात्यावर पकड होती. शेती, इथेनॉल, खाते, जैविक उर्जा, साखरकरखानदारी व साखरेच्या प्रश्नाबाबत ते तळमळीने प्रश्न मांडत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि इतर ज्वलंत प्रश्नांबरोबर दलित, शोषित, पिडीत अशा सर्वांसाठी त्यांनी सदैव संघर्ष केला.   वंजारी समाजातील असूनही जनसंघ तसेच विद्यार्थी परिषदेमुळे मुंडेसाहेबांचा शैक्षणिक व सामाजिक पाया भक्कम झाला होता.दिवसाचे सतरा अठरा तास काम करण्याची जिद्द आणि बौद्धिक क्षमतेची उपजत देणगी यामुळे साहेबांचा सुरु झालेला प्रवास केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचला.कदाचित ते महायुतीच्या राज्यात मुख्यमंत्रीही होऊ शकले असते पण नियतीला ते मान्य नसावे.बीड मध्ये आयोजित विजयी मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी दिल्लीच्या इंदिरागांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात असताना दि.३ जुन २०१४ रोजी सकाळी ६.१५ सुमारास मुंडेसाहेबांच्या मोटारीला भरधाव टाटा इंडिकाने धडक दिल्याने अपघाती निधन झाले.
साहेबांचा पार्थिवदेह ४ जुन रोजी परळी येथे आणण्यात आला.लाखोंचा जनसमुदाय अंत्यदर्शनासाठी उपस्थित होता.त्या लाखोंच्या जनसागरात साहेबांचा देह अनंतात विलीन झाला.साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबई व परळी या दोन्ही ठिकाणी साहेबांचे दर्शनासाठी ज्या प्रमाणात जनसमुदाय हजर होता तो नजीकच्या काळात कोणासाठीही जमल्याचे आठवत नाही.
साहेबांची दशक्रियाविधी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गावागावात केली गेली.लाखो तरुणांनी मुंडण करून शोक व्यक्त केला.त्या काळात अनेक घरात चुलीही पेटल्या नाहीत.आपल्या घरातील कोणी गेला याप्रमाणे मराठवाड्यातील प्रत्येक घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता.या दुखातून सावरण्यासाठी त्यांचे कुटुंबियांप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेस अनेक दिवस लागले.साहेबांच्या बीड मधील शोकसभेच्या जागेवर त्यांच्या कन्या प्रितम खाडे-मुंडे या पोटनिवडणुकीत सात लाखांच्या मताधिक्क्याने मतदारांनी निवडून श्रद्धांजली वाहिली.असा थोर जननायक लोकनेता पुन्हा होणार नाही.
 

Most Reading