Gopinath Munde Marathi Kavita

Nandkishor Wagh

Gopinath Munde Marathi Kavita

गोपीनाथरावजी तुम्ही एकदा येवून जा
विसरलाय स्वाभिमान प्रत्येक वंजारी..
विसरलाय स्वत:चीच अस्मिता....
त्यांच्या डोळ्यात थोड अंजन घालून जा..
गोपीनाथरावजी तुम्ही एकदा येवून जा........१

विळे- कुऱ्हाड सुद्धा झाल्यात गवताची पाती
विसरलोय आम्ही आपापसातील नाती
विस्कटलेली घरटी एकत्र करून जा
गोपीनाथरावजी तुम्ही एकदा येवून जा......२

शेती झाल्या बकरा-दारू पार्टीची स्थळे
राजकीय नेत्यांची विश्रांती स्थळे
याच शेतीला हक्काची गाडवाट देवून जा
गोपीनाथरावजी तुम्ही एकदा येवून जा..........३

 चुरगाळलीयेत पाने इतिहासाची साहेब तुमच्या प्रत्येक कार्याची..
इतिहासाच्या पुस्तकाला व्यवस्थित कव्हर घालून जा..
गोपीनाथरावजी तुम्ही एकदा येवून जा.......४

 उशिरा का होईना एकदा तरी येवून जा
नाहीच जमलं साहेब तुम्हाला यायला तर...
या शेतकर्याला व नांगराला पुन्हा एकदा बळ व सन्मान देवून जा....!
गोपीनाथरावजी............"साहेब" तुम्ही एकदा येवून जा.........५
॥ जय वंजारी ॥
॥जय भगवान ॥
॥ जय गोपीनाथराव ॥